राष्ट्रवादीच्या नेत्याची मनोहर भिडे यांच्या CAA समर्थनार्थ मोर्चाला हजेरी, राष्ट्रवादी कारवाई करणार का?

Update: 2019-12-30 16:35 GMT

सध्या देशात CAA आणि NRC चा विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. कॉंग्रेसचे सर्व शिर्षस्थ नेते रस्त्यावर उतरुण या कायद्याचा विरोध करत आहेत. तर तिकडे बसपा प्रमुख मायावती यांनी मध्य प्रदेशच्या महिला आमदार रमाबाई परिहार यांना या कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चामध्ये सहभाग घेतला म्हणून पक्षातून निलंबीत केलं आहे. त्यामुळं परिहार यांची आमदारकी गेली आहे.

तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या कायद्याला विरोध केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते विधीमंडळाच्या सभागृहात विरोध करताना दिसत आहेत. मात्र, ग्राउंडवर परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री जयंत पाटील यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी CAA आणि NRC च्या समर्थनार्थ मोर्चात सक्रीय सहभाग नोंदवला आहे.

सांगलीमध्ये मनोहर भिडे यांच्या नेतृत्वाखाली CAA आणि NRC च्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये सांगलीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शिंदे हे सुद्धा सहभागी झाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता बसपा प्रमुख मायावती यांच्याप्रमाणे शिंदे यांच्यावर कारवाई करणार का? की प्रदेशाध्यक्षांचे नातलग आहेत. म्हणून अभय देणारं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.

दरम्यान मनोहर भिडे यांचं कोरेगाव भीमा प्रकरणात देखील नाव आल्यानंतर स्वत: शरद पवार यांनी देखील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच भिडेंच्या मोर्चामध्ये आता राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सहभागी होत आहेत. त्यामुळं स्वत: शरद पवार या संदर्भात काय निर्णय घेतात. हे पाहणं महत्वाचं आहे.

मध्यंतरी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यावर हुसेन दलवाई यांनी सांगलीत दंगल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी मनोहर भिडे यांची बाजू घेतली होती असा आरोप देखील केला होता.

Similar News