शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणारच

Update: 2019-09-26 12:16 GMT

शिखर बॅकेच्या घोटाळा प्रकरणात ईडीने शरद पवार यांना नोटीस बजावल्याचं पुढे आल्यावर शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात जाणार असल्याचं सांगितलं होतं. पवार यांनी आपण 27 तारखेला ईडी कार्यालयात जाऊन प्रकरणात महिती देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं पत्रकार परिषदेत घोषित केलं होतं. त्यावर ईडीने तातडीने दखल घेत आता पवार यांना बोलावण्यात आलं नसल्याचा खुलासा काही प्रसार माध्यमांना दिला होता.

पण तरीही शरद पवार 27 तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. तसं त्यांनी सोशल मिडीयातून जाहिर केलं आहे. शरद पवार हे दुपारी 2 वाजता ईडी कार्यलयात जाणार असून त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे.त्याच बरोबर ईडीच्या परिसरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेऊन पोलीसांना सहकार्य करण्याचं आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Full View

Similar News