अमर जवान ज्योती विझणार? काय आहे सत्य?

Update: 2022-01-21 07:59 GMT

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण रहावे यासाठी गेल्या ५० वर्षांपासून इंडिया गेटवर ज्योत धगधगत ठेवण्यात आली आहे. पण आता २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन केली जाणार आहे. एकीकडे हा सोहळा होणार असताना विलीनीकरणानंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अमर जवान ज्योतीमधील अग्नी राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन केली जाणार आहे. इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील अग्नि राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवण्यात आलेल्या ज्योतीमध्ये आणून विलिनी केली जाईल. इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक ४० एकर जागेवर पसरले आहे. यामध्ये देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सुमारे २६ हजारांपेक्षा जास्त सैनिकांची नाव कोरलेली आहेत.

दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करत अमर जवान ज्योती येथील ज्योत विझवणे हा शहीद सैनिकांचा अपमान असल्याची टीका केली आहे.
"बहुत दुख की बात है कि हमारे वीर जवानों के लिए जो अमर ज्योति जलती थी, उसे आज बुझा दिया जाएगा। कुछ लोग देशप्रेम व बलिदान नहीं समझ सकते- कोई बात नहीं…हम अपने सैनिकों के लिए अमर जवान ज्योति एक बार फिर जलाएँगे!" अशी टीका केली होती. यानंतर ट्विटवर देखील #AmarJawanJyoti नावाने हॅशटॅग ट्रेंड झाला.



पण आता सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी ट्विट करत अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण होणार असले तरी त्यानंतर अमर जवान ज्योत विझवली जाणार नाही, यासंदर्भातल्या सर्व चर्चा खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



मर जवान ज्योती ही १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी अमर जवान ज्योतीचे लोकार्पण केले होते. पण आता यासंदर्भात ज्योत विझवण्यात येणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी परसल्यानंतर सरकारने ही ज्योत विझवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Similar News