Covid19: सरकार खाजगी रुग्णालयांवर अवलंबून का? - महेश झगडे

Update: 2020-07-09 14:50 GMT

कोरोना च्या काळात रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटल अक्षरश: ग्राहकांची लूट करत आहेत. अनेक रुग्णांना लाखोंची बील आली आहेत. तरीही सरकार आणि सरकारचं प्रशासन यावर ठोस कारवी करताना दिसत नाही. अशा परिस्थिती सरकारी यंत्रणा अपुरी पडल्याचं चित्र आहे. या संदर्भात माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी प्रशासनावर बोलताना...

जे चालले आहे तो पोरखेळ आहे आणि याला फक्त अधिकारीच जबाबदार आहेत. अशी सडेतोड टीका केली आहे. रुग्णांकडून लाखोंची बिलं का आकारली गेली? खाजगी हॉस्पिटलमधील कारभार कसा चालला? याची आयोगामार्फत चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून सरकारच्या आदेशाची कुणी कुणी अंमलबजावणी केली नाही. याचा पर्दाफाश होईल असं स्पष्ठ मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केलं आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात खाजगी ह़ॉस्पिटलमधील बिल जास्त का येतात? या विषयावर चर्चेत ते बोलत होते. कोरोना विरूध्दच्या लढाईत सरकारने खाजगी हॉस्पिटलला ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली तर आपण आणखी यशस्वी होऊ असं ते म्हणाले.

एपीडेमीक अक्ट आणि डिजास्टर अक्टमध्ये सरकारला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, प्रत्येक जीव वाचवण्यासाठी सरकारने आपली स्वत:ची सर्व यंत्रणा वापरली पाहिजे. खाजगी हॉस्पिटलवर अवलंबून राहीलं तर त्यात अनेक त्रुटी राहतील असं महेश झगडे म्हणाले.

जे सुरू आहे ते पोरखेळ असल्याची खंत व्यक्त करत ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी खाजगी हॉस्पिटल च्या 80 टक्के बेड ताब्यात घेतल्याचे परिपत्रक काढलं. त्यात क्षणी अधिका-यांनी सर्व हॉस्पिटल ताब्यात घेतली पाहिजे होती. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री पूर्णत: अधिकारी यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे हे तातडीने व्हायला हवे होते. पण ते झाले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ पहायला मिळतो असे ते म्हणाले.

गेल्या 70 वर्षात खाजगीकरण करा. असं सर्वत्र बोललं जातं आणि सरकारी अधिका-यांनी कुठे ना कुठे सरकारी यंत्रणेला कमी ठरवत खाजगीकरण करा. म्हणजे चांगलं काम होईल. असा चुकीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण सर्व खाजगीकरणावर अवंलबून आहोत.

खाजगी हॉस्पिटलवर आपण जास्त जाब विचारू शकत नाही. त्यामुळेच हा घोळ झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री हे सर्व अधिका-यांच्या पाठिंशी आहेत आणि याची अंमलबजावणी करण्याची जबाबादारी आहे. पण अधिकारी मात्र काही करताना दिसत नाहीत. त्यामुळे बीलं जास्त येत असून रूग्णांचे हाल होत आहे. याच्या चौकशीची मागणी झगडे यांनी केली आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते गणेश काळे यांनी नवी मुंबईत रूग्णांचे हाल होत असून महापालिकेच्या अधिका-यांचे लक्ष नाही. याचे दाखले दिले. सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत जे उपचार केले हा केवळ खोटा प्रचार आहे. असा आरोप केला. सरकार जे सांगत आहे. त्याचा त्यांनी पुरावा द्यावा असं आव्हानही काळे यांनी केलं.

या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांनी सरकारच्या आणि हॉस्पिटलच्या कामाविषयी मांडणी केली. साथीच्या आजारात आपण कसे वागले पाहिजे. याचा अनुभव असताना आपण फक्त का हॉस्पिटलवर अवलंबून राहिलो. अनेक दिवस आपण फक्त कस्तुरबा रूग्णालयावर भिस्त ठेवल्याने आजार वाढत राहिला असं ते म्हणाले. खाजगी हॉस्पिटल मधील उपचारात सरकारने दर निश्चिती करण्यात वेळ लागला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जेव्हा स्वत: रूग्णालयांना भेट दिली तेव्हा त्यांना कळाले की सरकारचे नियम पाळलेच जात नाही .

या चर्चासत्रात अनेक हॉस्पिटलकडून बिल जास्त का येतं? हॉस्पिटलमध्ये कर्मचारी का येत नाहीत, कोरोनावर मात करण्यासाठी काय उपयायोजना करायला हव्यात? या विषयावर रोखठोक चर्चा झाली.

Full View

Similar News