मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या का घटली?

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या तीन दिवसांपासून कमी होत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पण मॅक्स महाराष्ट्राने गेल्या 8 दिवसांतील आकडेवारीचा अभ्यास केला तेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या कमी दिसण्यामागचे एक कारण समोर आले आहे.

Update: 2021-04-27 15:26 GMT

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या तीन दिवसांपासून कमी होत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पण मॅक्स महाराष्ट्राने गेल्या 8 दिवसांतील आकडेवारीचा अभ्यास केला तेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या कमी दिसण्यामागचे एक कारण समोर आले आहे. गेल्या आठ दिवसांच्या आकडेवारीत मुंबईत सर्वाधिक कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली ती 26 एप्रिल रोजी....एका दिवसात केवळ 3 हजार 876 कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून आले. तर 8 दिवस आधी म्हणजे 18 एप्रिल रोजी कोरोनाचे 8479 रुग्ण आढळून आले होते.

8 दिवसांच्या या आकडेवारीत रुग्णसंख्या दररोज कमी होत आहे. पण त्याचबरोबर मुंबईत दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाणही गेल्या 8 दिवसात कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते आहे. RTPCR चाचणीला लागणारा उशीर याला एक कारण सांगितले जाते. अनेक ठिकाणी लोक चाचणीसाठी जात नाहीयेत, तर काही खासगी लॅब्जमध्येही चाचण्यांना वेळ लागत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यातूनच मग रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसते. खालील आकडेवारीवरुन आपल्या लक्षात येईल की गेल्या 8 दिवसात चाचण्यांचे प्रमाण कमी होत गेले तसे रुग्णांची आकडेवारीही कमी झाली आहे.


ही आकडेवारी पाहिली तर गेल्या आठ दिवसात चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे, तशी नवीन रुग्णांची आकडेवारीही कमी होत असल्याचे चित्र दिसते आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांनी बिनधास्त न होता मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि घरातच राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News