गुजरात दौरा करणाऱ्या मोदींनी फक्त गुजरातलाच मदत केली आहे का? फडणवीस म्हणाले?

Update: 2021-05-20 09:17 GMT

निसर्ग चक्रीवादळातुन सावरण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या कोकणवासीयांना वर्षभराच्या आतचं पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाचा मोठा सामना करावा लागला. या चक्रीवादळाने राज्याला, विशेषतः कोकणाला चांगलाच दणका दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सर्वच तालुके या चक्रीवादळाने प्रभावित झाले असून घर, गोठे, शाळा, शासकीय इमारती, फळबागा, उन्हाळी पिके, मच्छिमार यांचे प्रचंड नुकसान झाले असून पशुधन व जीवितहानी देखील झाली आहे.

या वादळाने फक्त महाराष्ट्रातच नुकसान झालं आहे. असं नाही तर समुद्र किनारी असलेल्या इतर राज्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे नुकसान झालेल्या प्रदेशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राला वगळले. या वरुन मोदींवर टीका होत आहे.

पंतप्रधानांनी महाराष्ट्राला वगळून गुजरात चा दौरा केल्याबाबत टीका होत असताना आता महाराष्ट्राला मदत मिळणार का? असा सवाल उपस्थित केला असता फडणवीस म्हणाले

चक्री वादळाचा लँड फॉल हा गुजरात मध्ये झाला, 45 लोक या वादळात मृत्युमुखी पडले. आणि खूप मोठ्या प्रमाणात गावच्या गावे उध्वस्त झाली. पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले. मात्र, मदत जाहीर केलेल्या प्रेस नोट मध्ये नुकसानग्रस्त राज्यांना मदत देण्याबाबत चे आदेश देण्यात आले आहेत.

या चक्रीवादळाने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक , गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र व दोन केंद्र शासीत प्रदेशांमध्ये नुकसान झालं आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर कोणत्याही राज्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण या सर्व राज्यांनी ते वाचलं आहे. आता याच्यामध्ये विशेषतः पाहिलं तर केरळ व तामिळनाडू ही भाजप ची राज्य नाहीत. तसेच गोवा व कर्नाटक ही भाजप ची राज्य आहेत. तरी देखील घोषणा गुजरातची झाली आहे. या सर्व राज्यांना मदत मिळणार आहे.

तौक्ते चक्री वादळातून पुन्हा उभे करण्यासाठी राज्यसरकारने कोकणवासीयांना एसडीआरएफ मधून तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Full View

Tags:    

Similar News