बत्ती का गुल झाली ? वीजतज्ञ प्रताप होगाडे

Update: 2020-10-13 12:18 GMT

सोमवारी मुंबई आणि परीसरात ३ ते १५ तासापर्यंत बत्तीगुल झाली होती. मुंबई ही शाची आर्थिक राजधानी आहे. महत्वाच्या उद्योगधंद्याचं केंद्र आहे. त्यामुळे सुरवातीपासून मुंबईची वीजपुरवठा यंत्रणा आयलॅंडीग पध्दतीनं बनवली आहे. तरी बत्ती गुल झाली. मुख्यमंत्र्यांनी टेक्निकल ऑडीट करण्याची घोषणा केली असली तरी दोन प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहीजेत. २०१० मधे असाच प्रकार झाला होता.

त्यावेळी समिती गठित करुन २०११ मधे अहवाल सादर केला. या समितीच्या अहवालाची ५० टक्केही अंमलबजावणी झाली नाही. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या फिडरची क्षमता वाढविण्याची गरज आहे.मुंबईत काही घडले की त्याचा परीणाम राज्यात देशात आणि जगात होतात.

राज्यात अतिरीक्त वीज असताना ग्रामीण भागानं काय घोडं मारलं आहे?शहरी भागात सरासरी १ तास ग्रामीण भागात सरासरी २ तास लोडशेंडींग आहे. शेतकऱ्यांना ५-६ तास फक्त वीज मिळते ही वस्तुस्थिती आहे. यामधे शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेबरोबरच महावितरणचं नुकसान होतं. या हजारो कोटीची नुकसानीला जबाबदार कोण. ग्रामीण भागात २४ तास वीज मिळाली पाहीजे. त्यासाठी पायाभूत सूविधा सक्षम करुन २०११ साली नेमलेल्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी प्रताप होगाडेंनी केली आहे.


Full View
Tags:    

Similar News