तेलाच्या किंमतीपेक्षा बॅरलच्या 'मीम्स'चा भडका, कोण आहे गुल्लू पत्रकार? |

Update: 2022-03-30 07:30 GMT

इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य माणसाचं कंबंरडं मोडलेले असताना मोदी सरकारीची भाटगिरी करण्यासाठी काही मराठी संपादक ही मोदी मिडिया बनून सरसावले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात मोदींनी दाखवलेल्या चातुर्याच्या कहाण्या या संपादकांनी सोशल मिडीयावर पसरवण्यास सुरूवात केली होती. युपी निवडणुकांनंतर ही तेलाच्या किंमती वाढणार नाहीत कारण मोदी सरकारने या परिस्थितीचा फायदा घेत रशियाकडून लाखो बॅरल तेल रूपयांच्या किंमतीत विकत घेतले असून त्यामुळे भारतात तेल स्वस्तच होणार आहे अशा अफवा या संपादकांनी पसरवण्यास सुरूवात केली.




 



मात्र काही दिवसांतच दररोज तेलाच्या किंमतीत भरघोस वाढ व्हायला सुरू झाली, आणि सामान्य माणसाचं कंबरडंच मोडलं. असं असलं तरी देशभरातली एकाही न्यूज चॅनेल किंवा वृत्तपत्राने या महागाईची दखल घेतली नाही. उलट, या परिस्थितीत मोदी सरकार असल्यानेच कसं सगळं कंट्रोल मध्ये आहे, नाहीतर श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली असती असं नवं नॅरेटीव्ह ही लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


 



पत्रकारांच्या या भाटगिरीला उत्तर म्हणून सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी मोहीम सुरू केली आहे. खास करून जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांच्या विरोधात मीम्स व्हायरल करण्यात आले आहेत. तेलाच्या किंमतीबरोबरच बॅरल मीम्स चा ही भडका उडाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रसाद काथे यांचा गुल्लू पत्रकार म्हणूनही उल्लेख केला आहे.


 



सोशल मिडीयावर व्हायरल असलेले काही मीम्स इथे वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत. हे सर्व मीम्स नेटकऱ्यांनी बनवलेले असून त्यातील आशयाशी मॅक्समहाराष्ट्र सहमत असेलच असं नाही.




 


Tags:    

Similar News