माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सदनीका ताब्यात घेण्याचे आदेश कोणी दिले?

कोविड काळात महापौर पदाचा दुरुपयोग करत किशोरी पेडणेकर यांनी टेंडर मंजूर करुन घेतले होते. एसआरएच्या प्रकल्पातील मालमत्ता कंपनीसाठी बेकायदेशीर पद्धतीने वापरली असे आरोप राजकीय नेत्यांच्याकडून त्यांच्यावरती करण्यात आले होते.

Update: 2022-11-19 08:39 GMT

मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कोविडच्या काळात महानगरपालिकेकडून कीश कंपनीचे टेंडर आपल्या मुलाला सरप्रसाद पेडणेकर यांना दिले होते. असा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावरती यापूर्वी राजकीय नेत्यांनी केला होता. कोविड काळात कीश कंपनीचे टेंडर मंजूर झाल्यानंतर त्यांच्या मालकी हक्क असणाऱ्या वरळीतील सदनिका खाली कंपनीसाठी गाळे घेण्यात आले होते. हे गाळे ताब्यात घेण्यात यावेत अशी मागणी राजकीय नेत्यांच्याकडून वारंवार केली जात होती.किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए प्रकल्पातील हे गाळे बेकायदेशीर असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते.

याच अनुषंगाने यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांनी भूमिका देखील स्पष्ट केली होती."माजी चौकशी करावी माझ्याकडे जे काय आहे ते कायदेशीर पद्धतीने आहे.त्यावर कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही" असे विधान केले होते. परंतू भाजपचे नेते किरिट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी एसआरए प्रकल्पातील अधिकाऱ्यांना भेटून बेकायदेशीर असणारे गाळे ताब्यात घ्यावेत. अशी तक्रार केली. त्यांची ही तक्रार स्विकारत, पुढील चार दिवसात हे गाळे महानगपालिकेचे अधिकारी ताब्यात घेऊन एसआरए च्या ताब्यात देतील असे आदेश एसआरए च्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Tags:    

Similar News