कोणी कापला आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता?

Update: 2019-10-03 04:46 GMT

कल्याण पश्चिम या मतदार संघात भाजपचे तुलनेने कमी प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. मात्र, 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपचे अतिशय एकनिष्ठ कार्यकर्ते नरेंद्र पवार निवडून आले. वास्तविक हा खुद्द नरेंद्र पवार आणि भाजपला देखील सुखद धक्का होता. मात्र, पाच वर्षांनी त्यांच्यावर पक्षाच्या विरोधात बंडखोरी करण्याची पाळी आली आहे.

गेली 5 वर्ष अथक मेहनत करून नरेंद्र पवार यांनी येथे स्वतःचा दबदबा या मतदार संघात निर्माण केला. याची धास्ती शिवसेने सोबत पक्षातील लोकांनी देखील घेतली. त्यामुळे नरेंद्र पवार यांचा पत्ता कट करण्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीत झाली, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा प्रचार करण्यास नकार दिला होता. भाजपने विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ सेनेला सोडण्याचे आश्वासन दिल्यावरच शिवसेना कामाला लागली.

मात्र, आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर भाजप अन्याय करणार नाही. असं वाटत होतं. मात्र, अखेर सेनेच्या मदतीने नरेंद्र पवार यांच्या विरोधकांनी बाजी मारली आणि निष्ठावंताला युतीचा धर्म मोडून बंडखोरीची वाट धरावी लागली आहे .

Full View

Similar News