कोरोनाशी लढा : ३ पदरी कापडी मास्क चांगला - WHO

Update: 2020-06-08 02:28 GMT

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोनापासून बचावासाठी आता मास्कच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत जातांना सगळ्यांनी तीन पदरी कापडी मास्कचा वापर करावा अशी सूचना WHO ने दिली आहे. त्याचबरोबर

संसर्ग असलेल्या भागातील वैद्यकीय कर्मचारी आणि इतरांनीही मेडिकल मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. सामूहिक संसर्ग असलेल्या भागात सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्यास ६० वर्षांवरील व्यक्तींनी आणि आजाराची पार्श्वभूमी असलेल्या लोकांनीही मेडिकल मास्क वापरावे असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर संसर्ग असलेल्या भागांमध्ये सर्वांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि कापडी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कापडी मास्क हे तीन पदरी असला पाहिजे असंही WHO ने स्पष्ट केले आहे. पण सोशल डिस्टन्सिंगला मास्क हा पर्याय नाही हे लोकांनी लक्षात घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सतत सुरू असलेल्या संशोधनानुसार WHO कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देत राहिल, अशी माहिती WHO चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेसेस यांनी दिली आहे.

Similar News