मुंबई मध्ये लोकल रेल्वे कधी सुरु होणार?

Update: 2020-06-11 03:37 GMT

मुंबईत (Mumbai) लोकल सेवा (local train)कधी सुरु होणार? या संदर्भात महत्त्वाची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. केंद्र सरकार ने अनलॉक1 (Unlock 1)ची घोषणा केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मिशन बिगन अगेन Mission Begin Again ची घोषणा करत राज्यात अनेक उद्योगांना परवानगी दिली आहे.

लॉकडाऊनमुळं (lockdown)ठप्प झालेली देशाची आर्थिक राजधानी मुंबई हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. राज्यसरकार ने खासगी कार्यालयांना १० टक्के किंवा १० कर्मचाऱ्यांना (या पैकी जे अधिक असेल) त्यांना काम करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र, मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा बंद असल्यानं ज्या कर्मचाऱ्यांना शासनाने काम करण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्यासह अत्यावश्य़क सेवेतील कर्मचाऱ्यांना ऑफिस पर्यंत येण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली आहे.

हे ही वाचा...


राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय

“रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. किमान अत्यावश्यक सेवेत येणारे जे लोक आहेत, मग त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय आहेत सोबतच इतरांना आणण्यासाठी तरी आम्हाला रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे,”

त्यामुळं आता केंद्रसरकारच्या भुमिकेकडे लक्ष लागलं आहे. त्यातच देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण एकट्या मुंबईत असल्यानं केंद्र सरकार काय निर्णय घेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

Similar News