मुख्यमंत्री आज काय बोलणार?

दिवाळीनंतर महाराष्ट्रात जागतिक महामारी कोरानाचा प्रादुर्भाव वाढीला लागल्यामुळं फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८ वाजता येणार आहेत.

Update: 2020-11-22 09:17 GMT

महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती नागरिकांना सातत्याने देत आहेत.

आज रात्री ८ वाजताही मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. नुकतेच राज्यातील प्रार्थनास्थळं उघडण्यात आली आहे. शाळा उघडण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुंबई लोकल देखील सर्वसामान्यांना खुली करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आहे का? पुन्हा लॉकडाऊन घोषीत होणार का ? याकडेही जनतेचे लक्ष आहे.

Tags:    

Similar News