टोल मुक्त महाराष्ट्र करु, या भाजपच्या घोषणेचं काय? राज ठाकरेंचा सवाल

अमित ठाकरे यांच्या टोल नाका तोडफोड प्रकरणानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी भाजपला धारेवर धरत 'टोल मुक्त महाराष्ट्र करु' या घोषणेच काय झाल? असा सवाल उपस्थित करत मुंबई-गोवा महामार्गवरून गडकरींसह भाजचे नेत्यांवर टीका केली आहे.

Update: 2023-07-26 10:29 GMT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाला टोल नाक्यावर थांबवल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे दौरा महत्वाचा असल्याने राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. मनसे पदाधिकाऱ्यांच्या टोल नाक्यावरील गडलेल्या प्रकरणावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान यावेळी त्यांना टोल नाका तोडफोड प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करतोय, तो टोलनाके फोडत चाललेला नाहीये. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. त्याच्या गाडीला फास्टटॅग असूनही त्याला टोल नाक्यावर अडवलं गेलं. नंतर फोनाफोनी झाली. टोलनाक्यावरील माणसाची वॉकी टॉकी सुरु होती. समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे बोलत होता. या सगळ्यावर आलेली ती रिअॅक्शन होती.... या सगळ्या प्रकरणावर भाजपने बोलण्यापेक्षा टोलनाका मुक्त महाराष्ट्र करु, या त्यांच्या घोषणेचं काय झालं? ते त्यांनी सांगावं", असं सूचक वक्तव्य राज ठाकरें यांनी केलं.

टोल मुक्त महाराष्ट्र करु, या घोषणेचं काय ?

यावेळी त्यांनी बोलत असताना भाजला चांगलेच धारेवर धरत त्यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले. या सगळ्या प्रकरणावर भाजपने बोलण्यापेक्षा टोलनाका मुक्त महाराष्ट्र करु, या त्यांच्या घोषणेचं काय झालं? ते त्यांनी सांगावं", असं आव्हान राज ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. आयआरबीचे म्हैसकर कुणाचे लाडके आहेत? त्यांनाच प्रत्येक वेळी कसे टोल मिळतात? असा प्रश्नही यानिमित्ताने राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

टोलमुक्त राज्य घोषणेचं काय?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मराठी आहेत, महाराष्ट्रातले आहेत आणि इथलेच रस्ते खराब आहेत याच्यासारखं दुर्दैव नाही. आमच्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले, त्याचं तुम्ही कौतुक करत नाही पण ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा दिली, त्या भाजपवाल्यांना तुम्ही एकही प्रश्न विचारणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गवरून गडकरींवर टीका

मुंबई-गोवा महामार्गाच काम हे गेली १७ वर्ष सुरु आहे त्या रस्त्यांची परिस्थिती बघा किती घाणेरडी आहे. लोकांना टोलवर सहा-सहा तास लागताहेत. आमचे एक मित्र नाशिकवरून येत होते. त्यांना सात तास लागले. खड्डे पडलेत. वाहतूक कोंडी होतेय. तुम्ही कसला टोल वसूल करता आहात? यावर भाजप काही बोलणार आहे का? 17 वर्षांपासून मुंबई-गोवा रस्ता सुरू आहे. 17 वर्षे लागतात का?”, असा खोचक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला

यावरुन सध्यातरी टोलनाका तोडफोडी वरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात चांगलीच जुंपली आहे.


Full View

Tags:    

Similar News