गुवाहाटीला गेलो आणि बदनाम झालो - बच्चू कडू

Update: 2023-09-06 10:45 GMT

आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आज दिव्यांग बांधवांचा दिव्यांगांच्या आपण दारी हा उपक्रम धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी धुळे जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते विविध योजनांचा लाभ या देण्यात आला. यावेळी बच्चू कडू यांना पुन्हा एकदा गुवाहाटीची आठवण झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या आपण दारी पुन्हा बच्चू कडू यांना गुवाहाटीची आठवण झाली. बच्चू कडू बोलताना म्हणाले की "महाराष्ट्र हा शिवरायांचा असून येथे समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले जाते, आम्ही सुरत गुवाहाटी जाऊन बदनाम झालो पण त्याबद्दल आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळाले असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की मागील सरकारमध्ये अडीच वर्षे माझ्याकडे राज्यमंत्री पद होते त्यावेळेस मी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करा मी तुमचा गुलाम राहील मात्र त्यांनी केले नाही. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत येण्याबाबत आम्हाला विचारले असता आम्ही तुमच्या सोबत येतो मात्र दिव्यांग मंत्रालय देणार असाल तरच येतो अशी अट घातली, आणि आज त्यांच्यासोबत गेल्याने दिव्यांग मंत्रालय मिळाले अशी भावना यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मांडली.


Full View

Tags:    

Similar News