CAA Protest: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

Update: 2020-01-05 06:05 GMT

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (Citizenship Amendment Act) आज भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार विराट कोहली ने (Virat Kohli) पहिल्यांदाच भाष्य केलं. सध्या या कायद्याचा देशात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. त्यातच आसाम मध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच आसाममध्येच भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट सिरीजमधील पहिल्या पहिला टी-20 सामना आसाममध्ये खेळला जाणार आहे. 5 जानेवारीला गुवाहटी येथे हा सामना खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा

‘अब्दुल सत्तार गद्दार, ‘मातोश्री’ची पायरी चढू देऊ नका’ – चंद्रकांत खैरे

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या: अब्दुल सत्तार

राज्यघटनेच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष शब्द वगळण्यात यावा – RSS संयोजक नंदकुमार

त्यामुळं सुरक्षेसंदर्भात गुवाहाटीच्या सुरक्षे संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विरोटने 'शहर पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्हाला इथल्या रस्त्यावर कोणतीही समस्या दिसली नाही.’

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जेव्हा कोहलीला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ‘मला या कायद्याबाबत बोलण्यासाठी पूर्ण माहिती घेतली पाहिजे, या संदर्भातील प्रत्येक बाब मला माहिती हवी, की ज्यामुळे मी जबाबदार पणे उत्तर देऊ शकतो’. असं म्हणत बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर विराट कोहली यांनी नोटाबंदी हा देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा ऐतिहासिक क्षण आहे. असं म्हटलं होतं. मात्र, या निर्णयावर बोलण्यास विराट ने नकार दिला आहे.

Similar News