MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक तोजगा सूचवला आहे. वडेट्टीवार सध्या कोरोनाबाधीत असल्याने त्यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोव्हिडचे रुग्ण वाढत असल्याने कोव्हिडची पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने mpsc ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब. कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची मुले मोठ्या प्रमाणात परीक्षा देत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी यावर तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच विरोधी पक्षांनी आगीत तेल घालून राजकारण करू नये, असा टोलाही लगावला आहे.