हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

Update: 2020-02-10 03:45 GMT

हिंगणघाट जळीत पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. पीडितेची प्रकृती खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. अवघ्या महाराष्ट्रात या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.

पीडितेवर 3 फेब्रुवारीला विकृताने अंगावर पेट्रोल टाकून भरचौघात पेटून दिले होते. त्यानंतर तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. आज सकाळी तिच्यावर उपचार सुरू असताना ऑरेंज सिटी रुग्णालयात सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.

गेल्या सात दिवसांपासून पीडित शिक्षिकेची मृत्यशी असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शनिवारपासूनच पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंगणघाट जळीतकांड पीडितेला वाचवू शकलो नाही अशी प्रतिक्रिया पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी दिली.

'पीडितेच्या शरिरामध्ये इन्फेक्शन वाढले होते. ७ फेब्रुवारीपासून ती व्हेंटिलेटरवर होती. तिचा रक्तदाब वर-खाली होत होता. काल रात्रीपासून तिचा रक्तदाब खूप खालावला होता. औषधं देऊन तिच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिचे हृदय दोन वेळा बंद पडले. इन्फेक्शनमुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम झाला होता. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाला.'

काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काल रात्रीपासून उपचारा दरम्यान पीडितेचे हृदय दोन वेळा बंद पडले होते. हृदयविकाराचा धक्का बसल्याने तिची प्रकृती खालावली. तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला.

“ पीडितेचा मृत्यू अतिशय दु: खद घटना आहे महिला सुरक्षितेबाबत जागृत राहने गरजेचं आहे”, असं मत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.

“देशातील अजून एका निर्भयाचा मृत्यू झाला” अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली.

“हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज”, असल्याची प्रतिक्रिया वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

“माझ्या मुलीला त्रास झाला, तसा त्या आरोपीला झाला पाहिजे. लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा, निर्भयासारखं प्रकरण लांबायला नको," असा संताप पीडितेच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी केला.

हिंगणघाट येथे नेमकं काय घडलं?संपूर्ण प्रकरण पाहा

हिंगणघाट जळीत प्रकरण : आरोपी विकी नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती अत्यंत नाजूक

हिंगणघाट जळीत प्रकरण; वर्धा जिल्हा थांबला..

 

Similar News