विदर्भावर महाराष्ट्राकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्याकडून 1953 च्या कराराचे पालन केले जात नाही. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत विदर्भवादी पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावेळी वामनराव चटप यांनी थेट लाठी आणि गोळीची भाषा करीत विदर्भ राज्य वेगळे करणार असल्याचे म्हटले आहे.
विदर्भ राज्याच्या वेगळ्या वेगळ्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समिती लढा देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून पाच जिल्ह्यातून विदर्भ निर्माण यात्रा नागपूर येथे निघणार आह. तसेच या दरम्यान स्वतंत्र वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी लावून धरत लाठ्या खाऊ, गोळ्या खाऊ, मात्र वेगळा विदर्भ राज्य मिळवून राहू, अशी भूमिका विदर्भवादी नेते वामराव चटप यांनी घेतली आहे.
वामराव चटप यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्हाला वेगळे विदर्भ राज्य हवे आहे. त्यासाठी आम्हाला लाठी आणि गोळ्या खायची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत. मात्र आम्हाला विदर्भ राज्य वेगळे करायचे आहे, असं वामराव चटप म्हणाले.