विजेचा वापर जपून करा; ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नागरिकांना आवाहन

Update: 2021-10-11 11:38 GMT

अहमदनगर :  आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची मागणी वाढल्याने सध्या सर्वत्र कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होऊन महाराष्ट्रासह देशात लोडशेडिंगचे संकट घोंगावत आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यातील नागरिकांना विजेचा वापर जपुन करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मालकीच्या कोळसा खाणीमध्ये ऑगस्ट महिन्यात कामगारांच्या झालेल्या संपामुळे तसेच इतर कारणामुळे कोळशाचा तुटवडा जाणवत आहे , सोबतच ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतीपंपासाठी विजेची मागणी वाढली होती. ऑगस्ट महिन्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोळसा खाणीमध्ये त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कोळशाचा अधिक तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वीज निर्मितीवर झाला असून येत्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना वीज तुटवड्याला सामोरे जावे लागू नये यासाठी राज्य सरकार तसेच महावितरण प्रयत्नशील आहे. यासाठी

हाड्रो पॉवर प्लांट , नॉन कलव्हेन्शलन सोर्सेस यांच्या माध्यमातून वीज मिळवण्यासाठी राज्य सरकार अधिकचे दर देऊन वीज खरेदी करत आहे. मात्र राज्यातील नागरिकांनी संभाव्य विज तुटवडा लक्षात घेऊन विजेचा वापर जपून करावा असे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले आहे.

कोळशाच्या संकटामुळे महावितरणाला (MSEDCL) वीज पुरवठा करणारे वीज केंद्रांचे एकूण 13 युनिट रविवारी बंद झाले. यामुळे राज्यात 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झाला आहे. ग्राहकांना कमी वीज वापरण्याचे आवाहन केले जात आहे.ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags:    

Similar News