कोरोनाशी लढा – अमेरिका भारताला करणार ही मोठी मदत !

Update: 2020-05-16 07:15 GMT

कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा पुरवठा केल्यानंतर आता अमेरिका भारताला व्हेन्टिलेटर्सचा पुरवठा करणार आहे.“अमेरिका भारताला मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स पाठवणार आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे आणि आमच्याकडे व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यातले काही आम्ही भारतातील आमच्या मित्रांसाठी देणार आहोत असे ट्रम्प यांनी सांगितले आहे”.

व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर “कोरोनावरील लसीबाबत भारत आणि अमेरिका एकमेकांना सहाय्य करीत असून या अदृश्य शत्रूविरुद्धचा लढा आम्ही जिंकू” असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताने गेल्या महिन्यात कोरोनावरील उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा पुरवठा अमेरिकेला केला होता. त्यानंतर ट्रम्प यांना मोदींचे कौतुक करत भारताचे आभार मानले होते.

Similar News