कमला हॅरीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून संवाद, काय झाली बातचीत?

Update: 2021-06-03 16:26 GMT


अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज फोनवर संवाद झाला. या संवादामध्ये लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर देशात असलेला लसीचा तुटवडा कमी होईल. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात...

थोड्या वेळापुर्वी कमला हॅरिस यांच्याशी बोलणं झालं. अमेरिकेच्या रणनीतिनुसार जागतिक लसीकरणाच्या अंतर्गत अमेरिकेने भारताला लस देण्याचं आश्वासन कमला हॅरीस यांनी दिलं आहे. त्यांचं मी कौतुक करतो. मी अमेरिकेने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Tags:    

Similar News