मोठी घोषणा: अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संबंध संपुष्टात

Update: 2020-05-30 03:54 GMT

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून WHO बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

"आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले संबंध तोडत आहोत. सार्वजनिक आरोग्याबाबत काम करणाऱ्या इतर संस्थांकडे हा निधी वळवण्यात येईल. सध्या चीनचं जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्ण नियंत्रण आहे. चीनला धडा शिकवण्यासाठीच आपण हा निर्णय घेतलाय. चीनमुळे आलेल्या जागतिक आरोग्य संकटामुळे एक लाख अमेरिकन नागरिकांचा बळी गेला आहे. चीनच्या दबाबामुळेच WHOने कोरोना व्हायरससंदर्भात संपूर्ण जगाची दिशाभूल केली. कोरोना व्हायरसच्या महामारीदरम्यान WHO ने योग्य पावलं उचलली नाही. संघटनेच्या चुकीच्या निर्णयांचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे."

असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने 2019 या वर्षात WHO ला 40 कोटी डॉलरपेक्षाही जास्त निधी दिला आहे. अमेरिका जगातील इतर देशांपेक्षा सर्वाधिक निधी या संघटनेला देत आला आहे.

Similar News