कोरोनावरील लसीचे २० लाख डोस तयार : ट्रम्प

Update: 2020-06-06 00:44 GMT

संपूर्ण जग कोरोनावरील लस कधी येईल याची प्रतिक्षा करत असताना अमेरिकेत या लसीच्या कामात मोठी प्रगती झाल्याचा दावा अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एवढेच नाहीतर, "या लसींचे २० लाख डोस तयार असून सुरक्षा चाचणीमध्ये ही लस पास झाली की लगेचच या डोसची वाहतूक सुरू करता येईल. आमच्या काल झालेल्या मिटींगमध्ये कोरोनावरील लसीचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून लवकरच आश्चर्यकारक परिणामांची अपेक्षा आहे." असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोना वरील लस या वर्षाच्या अखेरीस तयार होईल अशी माहिती ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत चीनवर पुन्हा एकदा टीका करत, "कोरोना हे चीनने जगाला दिलेले सगळ्यात वाईट गिफ्ट आहे. वुहानमधून कोरोनाचा संसर्ग झाला, पण तो चीनच्या इतर भागात पसरला नाही" असे म्हटले आहे.

Similar News