जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड

Update: 2022-02-18 11:33 GMT

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे.आज जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता.त्यात त्यांना अटक झाली होती.

दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडाळचे प्रकाश मोर्ये यांची निवड करण्यात आली.या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असण्याऱ्या नितेश राणे यांना ९ फेब्रुवारी ला कोर्टाने जामिन मंजुर केला.नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधिशांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जामिन मंजूर केला.दरम्यान दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला.दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल.याशिवाय पोलिस तपासात सहकार्य करतानाच पोलिस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित रहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा संशय आमदार नितेश राणे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता.

Tags:    

Similar News