उन्नाव प्रकरण : पीडितेचे पत्र मिळण्यास इतका उशीर का झाला? – सरन्यायाधीश रंजन गोगोई

Update: 2019-08-02 03:45 GMT

उन्नावमधील बलात्कार पीडितेच्या गाडीला ट्रकने टक्कर मारल्याची घटना घडल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी ही घटना आरोपी असलेल्या भाजप आमदाराच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप केला आहे. या आमदाराचे गुंड वारंवार येऊन त्यांना धमकावत होते. पिडीतेच्या घरच्यांनी या धमक्यांबद्दल १२ जुलै ला सरन्यायाधीश (CJI) रंजन गोगाई यांना पत्र लिहिले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनवाईमध्ये सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी पिडीतेच्या परिवाराने लिहीलेले पत्र सादर करण्यास विलंव का झाला? असा जाब विचारला आहे. तसंच तात्काळ या प्रकरणाची सुनवाई केली जाईल हे देखील स्पष्ट केले आहे..

सरन्यायाधीश यांनी पिडीतेच्या परिवाराने लिहीलेल्या पत्राची माहिती त्यांना मंगळवारीच कळाली असल्याचं सांगत परंतु अद्यापही त्यांनी ते पाहिले नाही. या अतिशय बिकट परिस्थितीत पिडीत तरुणीसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असे देखील गोगाईंने म्हटले आहे. पिडीतेच्या बहिणीने एक व्हिडीओ प्रसारीत करुण केला असून आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचे लोक त्यांना धमकी देत होते. असं या व्हिडीओत म्हटलं आहे.

रविवारी जेव्हा पीडित मुलगी जेल मध्ये बंद असलेल्या तिच्या काकांना भेटायला जात होती. तेव्हा रस्त्यावरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने जोरदार टक्कर मारली. या दुर्दैवी घटनेत पिडीतेच्या आई आणि काकूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पीडित तरुणी आणि वकील यांची अवस्था अतिशय गंभीर आहे.

या घटनेचा तपास सीबीआईच्या हाती सोपवण्यात आला आहे. या खटल्यात विधायक कुलदीप सिंह सेंगर व त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर यांच्यासह अन्य ८ लोकांविरुद्ध हत्या तसेच हत्त्येचा प्रयत्न करण्याबाबतची तक्रार पिडीतेच्या काकांनी दाखल केली आहे.

Similar News