केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारांना शिवीगाळ ; कारवाई होण्याची शक्यता

Update: 2021-12-15 13:35 GMT

नवी दिल्ली//लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी एसआयटीच्या अहवालाबाबत प्रश्न विचारलाने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारांनी शिवीगाळ करत पत्रकारावर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर मिश्रा यांच्यावर मोठी कारवाई होण्याची आहे. अजय मिश्रा यांना तातडीने दिल्लीला येण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला असून, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

लखीमपूर खीरी प्रकरणामध्ये अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा गोत्यात आला आहे. तो सध्या अटकेमध्ये असतानाच लखीमपूरची घटना हा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल एसआयटीने दिला. तसेच न्यायालयाच्या आदेशाने मिश्रा व अन्य आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली आहेत. अजय मिश्रा आज लखीमपूरमधील ओयल येथे एका ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले असता,काही पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. तयावरून मिश्रा भडकले. आणि त्यांनी थेट पत्रकाला शिवी दिली आणि त्याच्या अंगावर ते धावून गेले. त्यांनी पत्रकारावर हात उचलल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून अजय मिश्रा यांना तातडीने दिल्लीला येण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. ते सायंकाळीच लखनऊ येथून विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत.

Tags:    

Similar News