सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवले, अद्याप न्याय नाही

Update: 2019-12-17 07:59 GMT

खेड तालूक्यातील तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी खेड यांच्या कार्यालया समोर राजगुरूनगर येथील सोनवणे कुंटूंबाने आमरण उपोषण सुरू केलं आहे. सोनवणे कुटुंबाची वडिलोपार्जित जमिन गट क्रमांक २७१ ही मु.पो पाईट ता खेड जिल्हा पुणे, येथील जमिनीचे क्षेत्र २ एकर ६ गुंठे असून. सन १९९७ साली कैलासवासी शंकर मारुती रौनधळ ही व्यक्ती मयत असताना याच नावाची व्यक्ती सन २००६ साली जिवंत दाखवून सवर्ण समाजाच्या काही व्यक्तींनी सोनवणे कुटुंबाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनी फक्त सोनवणे कुंटुूंबाची फसवणूक न करता "सरकारची सुध्दा फसवणुक केल्याचा दावा या परिवाराने केला आहे." सदरच्या जमिनीचे कोणतेही मालकी हक्क नसताना खोट्या पद्धतीने जमीनेचे खरेदीखत करून ७/१२ वर नोंदणी केली असून, सोनवणे कुटुंबावर अन्याय केला आहे. सोनवणे कुटुंबाने सन २००८ पासून ते आत्ता पर्यंत न्याय मिळविण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयाचे उंबरे झीजवले असून अद्याप न्याय मिळालेला नाही.

सदरचे उपोषण भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय शिवराम डोळस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे. त्याप्रसंगी भिमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. सुरेश भाऊ कौद्रे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक किरण दादा अहिर, रिपब्लिकन पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष मा.हृषीकेश डोळस, खेड तालुक्यातील रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते तसेच राहुलदादा डोळस मित्र परिवाराचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्याप्रसंगी सर्व मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला असून पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी संकल्प केला आहे.

Full View

Similar News