कल्याणमध्ये उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, 500 नागरिकांना वाचवले

Update: 2021-07-22 07:59 GMT


कल्याण : गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. त्यातच कल्याणमधील वालाधुनी परिसरात पावसामुळे 8 ते 10 फूट पाणी भरले गेले आहे. या पाण्यामुळे परिसरात राहणारे नागरिक अडकून पडले होते. अशा 500 हुन अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले आहे..



 


कल्याणच्या वालधुनी परिसरात गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाली. नागरिकांच्या घरात 8 ते 10 फूटांपर्यंत पाणी घुसले. नदीच्या शेजारी राहत असल्याने लोकांच्या घरात हे पाणी घुसले. कल्याणमध्ये पावसाचा जोर कमी झाला परंतु समुद्राच्या भरतीमुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी न झाल्याने अनेक नागरिक हे घरांमध्ये फसले होते. अशा 500 हून अधिक नागरिकांना कल्याणच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

Similar News