भारतीय वंशाच्या प्रिती पटेल इंग्लंडच्या गृहसचिव

Update: 2019-07-25 04:52 GMT

वादग्रस्त प्रिती पटेल यांना नवीन ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी गृहसचिव म्हणून नेमलं आहे. प्रिती पटेल भारतीय वंशाच्या आहेत. प्रिती पटेल यांनी याआधी ब्रेक्झिटला पाठींबा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी गुप्त बैठक केल्याबद्दल त्यांना आधीच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कॅबिनेट मधून राजीनामा द्यावा लागला होता.

प्रिती पटेल ( PRITI PATEL ) ब्रिटनच्या पहिल्या भारतीय वंशाच्या पंतप्रधान बनतील असं भाकित या आधी तत्कालिन ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमारून यांनी केलं होतं. बोरीस यांच्या कॅबिनेटमध्ये आलोक शर्मा, ऋषी सुनाक, साजीद जावेद या दक्षिण आशियाईंचा ही समावेश आहे.

Similar News