पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे

Update: 2019-10-24 12:03 GMT

आज महाराष्ट्रच्या विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जनतेच्या आभार मानले.

"पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतोय, कारण शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल असं मतदान त्यांनी केलेलं आहे. मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या जनतेचा, त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली. जो जनादेश महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे, तो सर्व राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा आहे."

असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही असं म्हटलं होतं. मात्र, राज्यातील जनतेनं विरोधी पक्षाला बऱ्यापैकी जागा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेसाठी मोठं विधान केलं. पुन्हा एकदा ५०-५० सुत्रांचा पुनरुच्चार यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना ५०—५० फॉर्म्युला ठरला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या विनंती नुसार आम्ही कमी जागा घेतल्या. मात्र, सत्ता स्थापना करताना आता ५० – ५० ( फिप्टी -फिप्टी) होईल. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्याच्या सत्तेत शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावं. याचं सुतोवाच केलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2763179467066470/?t=1

 

 

 

 

Similar News