यु टर्न म्हणजेच उद्धवजी टर्न- चंद्रकांत पाटील

Update: 2019-12-25 10:06 GMT

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखाची कर्जमाफी स्वागतार्ह आहे मात्र ही शुद्ध फसवणुक आहे. प्रत्यक्ष सत्तेमध्ये नसताना मागण्या करणं सोप असतं आणि सत्तेत आल्यानंतर कळतं हे प्रॅक्टीकल नाही असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं. पुणे येथील एका कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जो शब्द दिला होता त्यानुसार शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी यु टर्न मारला” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

“यु टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटलं पाहीजे. उद्धवजी टर्न म्हणजेच उद्धव नावात येणारा यु आणि दिलेल्या प्रत्येक शब्दातुन ते माघार घेतात.” असं स्पष्टीकरण पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला दिलं.

सरकारने दोन लाखाची कर्जमाफी केली. २००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफीला राहिला नाही. आता फक्त दोन लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी (Farmer's loan waiver) दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणुक असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/767532340429060/

 

Similar News