शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माेठी घोषणा

Update: 2019-12-21 11:40 GMT

नागपुर विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली असुन ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

नैसर्गक आपत्तींमुळे शेतकऱ्याचं कंबरडं माडलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं थकीत कर्ज आम्ही माफ करत आहोत. कर्जमाफीच्या प्रक्रीयेची सुरवात मार्च महिन्यापासुन होईल आणि कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्य़ा खात्यात येतील असं म्हटलं आहे.

Similar News