तिकीटासाठी उदयनराजे दिल्लीपुढे नतमस्तक...! जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

Update: 2024-04-16 12:18 GMT

महायुतीकडून उदयनराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघातून नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना त्यांच्या उमेदवारीवरून खोचक टीका केली आहे. महायुतीकडून सातारा लोकसभेची उमेदवारी भेटावी म्हणून उदयनराजे दिल्लीच्या तख्तासमोर शरण गेले. दिल्लीत जाऊन ते तिकीट द्या, तिकीट द्या अशी विनवणी करत होते, ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला फारसी आवडणारी नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

छत्रपतींच्या गादींच्या सन्मान ठेवायला पाहिजे होता

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सातारची गादी असो किंवा कोल्हापूरची गादी असो. या गादीबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचारांचे पालन करत पुढे घेऊन जायला पाहीजे. पण उदयनराजे यांची कृत्यं, दुष्कृत्यं सर्वत्र बघितली आहेत. त्यांनी छत्रपतींच्या गादींच्या सन्मान ठेवायला पाहिजे होता. कारण महाराष्ट्राला एक परंपरा आहेत, असं आव्हाड म्हणाले.

शाहू महाराजांना विनवणीची गरज पडली नाही.

दरम्यान, शाहू महाराज आणि उदयनराजे यांच्यात तुलना करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शाहू महाराजांना घरी बसून तिकीट देण्यात आलं. त्यांना तिकीट मागण्यासाठी कुणाकडे जायची गरज पडली नाही किंवा त्यासाठी कुठं फिरण्याची वेळही आली नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशा पध्दतीनं तिकीट मिळवणं म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. तुम्ही आज ज्याचा वारसा सांभाळता त्याच गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होतं. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्लीपूढे जाऊन नतमस्तक होत असेल, तर तो तुमचा नाही, अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ठणकाऊन सांगितले. 

Tags:    

Similar News