रायगड जिल्ह्याची चिंता वाढली, परदेशातून आलेले दोन नागरिकांना ओमिक्रॉनची लागण

परदेशातून रायगड जिल्ह्यात आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याची चिंता वाढली आहे

Update: 2021-12-18 01:21 GMT

रायगड (धम्मशील सावंत)// देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, त्यात आणखी दोन रुग्णांची बाहेर पडली आहे. रायगड जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा

शिरकाव झाला आहे, परदेशातून आलेले दोन नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. ओमन आणि साऊथ आफ्रिका येथून दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रवाशांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमान येथून माणगाव गोरेगाव येथे आलेली महिला आणि साऊथ आफ्रिकेतून खारघर येथे आलेल्या पुरुषाला ओमिक्रॉनची लागण झाली.त्यामुळे आता रायगड जिल्ह्याची चिंता वाढली असून, जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दोघांच्याही संपर्कात आलेल्यांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News