डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘तो’ निर्णय केला रद्द

Update: 2020-07-15 01:58 GMT

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांविरोधात ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केला आहे.

जे परदेशी विद्यार्थी कोरोना संकटाच्या काळात ऑनलाईन शिक्षण घेणार आहेत त्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला होता. पण या निर्णयाला हार्वर्ड आणि एमआयटी सारख्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांनी कोर्टात आव्हान दिले आहे.

त्याचबरोबर 17 राज्य आणि काही महाविद्यालयांनीही या निर्णयाला आव्हान दिले होते. यानंतर ट्रम्प यांनी या निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

है ही वाचा..

गुन्हेगारी जगतात नेमकं चाललंय काय?

बोगस बियाणे: काय घडलं कोर्टात?

धारावी: तीन महिन्यांपासून गावाकडं रुपया पाठवला नाही, कसं जगत असतील…

ज्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाणार आहे तिथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

पण हा निर्णय अत्यंत क्रूर, बेकायदा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्याचबरोबर जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. भारतानेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

Similar News