Home > मॅक्स रिपोर्ट > धारावी: तीन महिन्यांपासून गावाकडं रुपया पाठवला नाही, कसं जगत असतील…

धारावी: तीन महिन्यांपासून गावाकडं रुपया पाठवला नाही, कसं जगत असतील…

धारावी: तीन महिन्यांपासून गावाकडं रुपया पाठवला नाही, कसं जगत असतील…
X

धारावी ही मुंबईचा प्राण की जीवच आहे. कारण या धारावीने लाखो लोकांना जगायला शिकवलं. स्वप्न पाहायला शिकवलं. आपल्या कुशीत घेतलं. लोक या धारावीत येताना एक नवीन स्वप्न घेऊन येतात आणि ती पूर्ण करण्याच्या तयारीला लागतात.

चल्लथराय हे असेच एक निष्ठावंत धारावीकर आहेत. त्यांना मी निष्ठावंत का म्हणालो आहे. ते नंतर सांगतो पण चल्लथराय यांचं आजच वय 65 वर्ष आहे. गेल्या 45 वर्षांपासून ते धारावीत राहत आहे. "धारावी" जगत आहे. या कोरोनाच्या काळात या धारावीतून अनेक कामगारांनी पाठ दाखवत गावी निघून गेले. पण त्यात हे चल्लथराय गृहस्थ या परिस्थितीच्या काळात देखील इथेच राहिले.

आपला व्यवसाय ते करत राहिले. चल्लथराय हे धारावीत गेल्या 35 वर्षाहून अधिक एकटेच राहतात. त्यांचं कुटूंब हे गावी राहत आणि धारावीत आपला व्यवसाय करून ते आपलं गुजराण करतात. आपल्या गावी कुटुंबाला ते थोडे फार पैसे पाठवून देतात. चल्लथराय हे खारे शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी ते खूप मेहनत करतात. कारण ते 65 वर्षाचे आहे. या वयात लोक रिटायर्ड होतात आणि घरी बसतात. पण हे चल्लथराय अजून पण तरुण्यातल्या मानसासारखे काम करतात आणि त्यांचा हा व्यवसाय निरंतर चालू आहे. ते कधीच थकले नाही आहेत.

चल्लथराय यांनी मॅक्समहाराष्ट्र शी सवांद साधताना सांगितलं की, गेल्या 35 वर्षांपासून मी शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय करत आहे. पण या लॉकडाउनच्या परिस्थितीत काहीच व्यवसाय चालला नाही. पण पोटापुरता व्यवसाय झाला आहे. काही आजूबाजूच्या लोकांनी मला मदत केली आहे. धारावीत मी भाड्याच्या घरात राहतो. माझ्या घराचं भाडं हे 3500 रुपये आहे. माझ्या गाडीचं भाडं हे महिना 1000 रुपये इतका आहे. महिन्याला मी पूर्वी 15000 ते 20000 कमवायचो पण या लॉक डाऊन मुळे खूप परिस्थिती बिकट झाली आहे.

चल्लथराय यांचे पोट आजुबाजुंच्या लोकांमुळ भरलं. मात्र, गावाकडच्या लोकाचं पोट लॉक झालं. त्यामुळं ते आजही चिंतीत आहेत. माझं भागलं गावाकडच्या तोंडाना काय पाठवू असा सवाल आता त्यांच्या समोर आहे.

मुंबईत असे अनेक राज्यातील लोक एकटे कष्ठ करुन घरी पैसा पाठवतात. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गरीबांना श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱी धारावी पुन्हा एकदा सुरुळीत चालावी. अशीच इच्छा चल्लथराय बोलून दाखवतात.

Updated : 14 July 2020 2:30 AM GMT
Next Story
Share it
Top