गुन्हेगारी जगतात नेमकं चाललंय काय?

गुन्हेगारीचं माहेरघर असलेल्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठ पोलिसांचा जीव घेणाऱ्या विकास दुबे याला पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार केले. या एन्काऊंटर मुळे अनेक चर्चा सुरु झाल्या. यात यूपी सरकार आणि पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. विकास दुबे सारख्या गुन्हेगारांचा जन्म कसा होतो.

त्यांना खतपाणी पुरवणारे कोण आहेत असे प्रश्न समोर येतात पण त्यांचे उत्तर कधीच मिळत नाही. भारतीय संसदेत ५४३ खासदारांत २३३ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खासदार आहेत. जोपर्यंत संसदेत असे गुन्हेगार ठाण मांडून बसतील तो पर्यंत समाजात असे अनेक गुन्हेगार जन्माला येतील.

खरंतर गुन्हेगारी जगतात नेमकं काय सुरु आहे. लोकशाहीचा रथ कुठल्या मार्गावर चाललाय सांगतायेत समाजसेविका मुक्ता मनोहर नक्की पाहा हा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here