तृणमूल काँग्रेसचे नेते मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन ; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Update: 2021-11-05 01:18 GMT

कोलकाता // पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुब्रत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला.

सुब्रत मुखर्जी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः रुग्णालयात पोहोचल्या आणि त्यांनीच आपल्या सहकारी नेत्याच्या मृत्यूबाबत सांगितले.  सुब्रत मुखर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पंचायत राज विभागाचे मंत्री होते.

SSKM रुग्णालयात पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, की त्यांनी आयुष्यात अनेक मोठी संकटं पाहिली,मात्र ही खूप मोठी हानी आहे. सुब्रत मुखर्जी यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती मला मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News