आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेमध्ये राज्यात १४,५२६ रुग्णांवर उपचार

Update: 2020-03-03 10:58 GMT

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून एकत्रितपणे राज्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना केंद्र शासनाच्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये सामाजिक, आर्थिक व जात जनगणना २०११ मधील ८३.७२ लक्ष कुटुंब महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत.

या योजनेची सुरुवात २३ सप्टेंबर २०१८ ला झाली आहे. या दोन्ही योजेअंतर्गत आत्तापर्यंत ९,३४,७०६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत फक्त १४ हजार ५२६ च रुग्णांना लाभ मिळाला आहे. उर्वरित ९ लाख २० हजार १८० रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले गेले आहेत.

या संदर्भात विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, शरद रणपिसे यांच्यासह बहुतेक आमदारांनी याविषयी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री राजेश टोपे यांनी हे उत्तर दिले.

Similar News