हे आहेत, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे 10 निर्णय

Update: 2019-08-07 10:33 GMT

आज झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याच्य़ा निर्णयास महत्वाचे निर्णय घेण्यात आले वाचा काय आहेत हे महत्त्वाचे निर्णय...

1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.

2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.

3.जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.

4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करून त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.

5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.

6.गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.

7.चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.

8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.

9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत.

10. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता

Similar News