राज्यातील दुकानांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Update: 2020-07-08 01:30 GMT

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर आता मिशन बिगिन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात सरकारने सम-विषम तारखांनुसार दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

राज्यातील नॉक कंटेनमेंट झोन वगळता सर्वत्र या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही परवानगी देण्यात आली होती. आता सरकारने या वेळेत 2 तासांनी वाढ करत दुकाने खुली ठेवण्याची संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसंच आता सातही दिवस सम-विषम पद्धतीनुसार दुकाने खुली ठेवता येणार आहेत.

“दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्यासाठी राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने आता ९ जुलैपासून सकाळी ९ ते सायं ७ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी.”

हे ही वाचा..

असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान राज्य सरकारने लॉकडाऊनबाबतच्या निर्णयाचे अधिकार त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही शहरांमध्ये 8 ते 10 दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहेत. यात जीवनावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा सध्या बंद आहेत.

Similar News