पॉझिटिव्ह रुग्णाला बरं झाला म्हणून दिला डिस्चार्ज, नवी मुंबईतील हॉस्पिटलचा प्रताप

Courtesy:- Social Media

मुंबई आणि मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना योग्य सुविधा नसल्याच्य़ा बातम्या तुम्ही वाचल्याच असतील. मात्र, अलिकडे खाजगी रुग्णालय़ कोव्हिड च्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचं देखील समोर आलं आहे. नवी मुंबईत तर एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. कोरोना बाधीत रुग्णाकडून लाखाच्यावर बील तर घेतले. मात्र, रुग्ण बरा होण्याआधीच त्याला सुट्टी देण्यात आली.

नवी मुंबईतील एक युवक कोव्हिड पॉझिटीव्ह असल्या कारणाने वाशी येथील फोर्टिज हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याकरिता भरती झाला असता, त्याच्यावर योग्य ते उपचार न करता व त्याला पूर्ण बरे वाटत नसतांनाही काही दिवसांनी त्याचा कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह आला असे सांगून त्याच्याकडून १ लाख २५ हजार चे बिल घेण्यात आले. व त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा त्रास कमी होत नसल्यामुळे व लक्षणे असल्यामुळे त्याने २ दिवसात मेट्रो पोलिस लॅब या खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. यावर खोटा रिपोर्ट देऊन, रुग्ण पूर्ण बरा झालेला नसतांना जबरदस्ती डिस्चार्ज देऊन रुग्णाला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सदर हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनपा आयुक्त व पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

सदर रुग्णाच्या घरी आई वडील बायको मुलं राहत असून रुग्णाच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? निव्वळ काही नफेखोरीसाठी हे खाजगी हॉस्पिटल रुग्णांचा जीव वेठीस धरत आहेत. म्हणून या आणि अशा हॉस्पिटल वर कारवाई होणे महत्त्वाचे असल्याचे मत गजानन काळे यांनी मांडले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार या हॉस्पिटलला नाही. त्यामुळे त्यांना चाप बसावा अन्यथा मनसेला कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असा इशारा इशारा मनसेने दिला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here