एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा असा वाद सुरू झालेला असताना याला संविधानाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बंधुभावाचा संदेश दिला आहे, हे धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या लोकांना सांगण्यासाठी हे वाचन कऱण्यात आल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.