सत्य delete केले जाऊ शकत नाही हे सरकारला दाखवा- महुआ मोईत्रा

Update: 2021-04-26 02:50 GMT

देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर होत आहे. यामध्ये ट्विटवरुन सर्वाधिकपणे टीका केली जात आहे. या टीकेला घाबरुन केंद्र सरकारने रविवारी ट्विटरला आदेश देऊन सरकारविरोधातील काही जणांचे ट्विट्स काढून टाकण्याचे आदेश दिले. काही जणांचे ट्विट्स हे खोटी माहिती पसरवणारे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यानुसार ट्विटरने काही ट्विट्स डिलीट केले. पण आता यावरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. मोईत्रा यांनी अनेक चिता पेटल्या असल्याचे दोन फोटो रिट्विट केले आहेत. हे दोन फोटो केंद्र सरकारने डिलीट केले आहेत, पण यामध्ये कोणती चुकीची माहिती आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच नेटिझन्सनी हे फोटो जास्तीत जास्त ट्विट करुन सत्य कधीच डिलीट केले जाऊ शकत नाही, हे दाखवून द्या असे आवाहन केले आहे.

खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन केंद्रावर ट्विटवरुन टीका केली होती. त्यामुळे मोदी सरकारने ट्विटरला नोटीस बजावली. त्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे ट्विट असल्याने ते डिलीट केले जात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. पण आता सरकारच्या या कारवाईवर अनेक स्तरातून जोरदार टीका होत आहे.

Similar News