४३ कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा

काय आहे ट्रम्पची ‘गोल्ड कार्ड’ योजना ? कसा करावा अर्ज ?;

Update: 2025-06-12 15:13 GMT

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर ‘गोल्ड कार्ड’ योजनेसाठी वेबसाईट लॉण्च केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोल्ड कार्डबाबत जोरदार चर्चा सुरू होती.

गोल्ड कार्डसाठी कोणताही परदेशी नागरिक अमेरिकेत ४३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर या योजनेसाठी अर्ज करू शकतो

ट्रम्प गोल्ड कार्ड म्हणजे काय?

ट्रम्प गोल्ड कार्ड ही अमेरिकेच्या स्थायी निवास आणि नागरिकत्वासाठी (Permanent Residency and Citizenship) एक नवीन योजना आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ मध्ये ही योजना जाहीर केली आहे. या कार्डद्वारे, परदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकेत ५ मिलियन डॉलर (सुमारे ४३ कोटी रुपये) गुंतवणूक केल्यास, त्यांना अमेरिकेतील स्थायी निवासाचा ग्रीम कार्ड (Green Card)सारखा आणि नागरिकत्वाचा मार्ग मिळू शकतो.

गोल्ड कार्डचे मुख्य वैशिष्ट्ये:

गुंतवणूक: अर्जदाराने किमान ५ मिलियन डॉलर अमेरिकेत गुंतवावे लागतील.

उद्दिष्ट: श्रीमंत गुंतवणूकदारांना आकर्षित करून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे.

प्रक्रिया: अर्जदारांना trumpcard.gov या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करता येते.

कार्डचे स्वरूप: या कार्डावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी असते.

नागरिकत्वाचा मार्ग: हे कार्ड थेट नागरिकत्व देत नाही, पण नागरिकत्वासाठी योग्य पर्याय आहे

विद्यमान EB-5 व्हिसासारखेच, पण अधिक प्रीमियम आणि जलद प्रक्रिया असलेली योजना

ट्रम्प गोल्ड कार्डसाठी अर्ज कसा करावा

trumpcard.gov या अधिकृत सरकारी वेबसाइटवर जा.

वेबसाइटवर एक अर्ज फॉर्म उपलब्ध आहे. फॉर्ममध्ये तुमचे नाव,देश,ई-मेल,पत्ता याची माहिती भरा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर,अमेरिकेतील सरकारी अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.

त्यानंतर तुम्हाला गुंतवणुकीचे कागदपत्रे आणि इतर पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लगेच गोल्ड कार्ड मिळणार नाही. त्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट ाहे.

पात्रता आणि गुंतवणुकीची पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

Tags:    

Similar News