विद्यार्थांनो टेन्शन नाही; महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार: उच्चतंत्रशिक्षण मंत्री

जागतिक महामारी कोरोनाच्या संकटात समस्त विद्यार्थी वर्ग कधी राज्यपाल तर कधी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणांमुळे पिचला असताना आता सलग दुसऱ्या वर्षी डोक्यावर परीक्षांचे ओझे असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थांना दिलासा देत सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे सांगितले आहे.

Update: 2021-01-24 11:22 GMT


कोरोनाच्या संकटामुळे गेली जवळपास वर्षभर महाविद्यालये बंद आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.गतवर्षी परीक्षांचा घोळ राज्य सरकार आणि राज्यपाल तसेच युजीसीच्या गोंधळात अडकला होता. आता परीस्थिती पूर्वपदावर येत असताना अजूनही विद्यार्थांच्या मनात संदिग्धता आहे. त्यामुळे महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठांशी चर्चा करुन परीक्षांचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.तुर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी शेवटी सांगितले.

Tags:    

Similar News