रिपब्लिकचा TRP घोटाळा, मुंबई पोलिसांचा गौप्यस्फोट

Update: 2020-10-08 13:42 GMT

ज्या टीरआपीच्या आधारावर न्यूज चॅनेल जाहिरातदारांकडून पैसा उकळतात तो टीआरपी ठरवून वाढवला जातो, असा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये रिपल्बिक टीव्हीचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स मराठी चॅनेलच्या मालकांना अटकही केली आहे.

बार्क नावाच्या संस्थेतर्फे दर आठवड्याला चॅनेल्सचा टीआरपी घोषित केला जातो. पण हा टीआरपी वाढवण्यासाठी या चॅनेल्सतर्फे एजन्सीला पैसे देण्यात आले होते असा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे. तपासात रिपब्लिक टीव्हीचेही नाव समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. टीआरपी मोजण्यासाठी बार्कतर्फे काही घरांमध्ये बॅरोमीटर्स लावण्यात आले होते. त्यावरुन कोणते चॅनेल जास्त पाहिले जाते त्याचा टीआऱपी जास्त असा निष्कर्ष काढला जातो. या घरांमध्ये आपलेच चॅनेल जास्त लावले जावे यासाठी या तिन्ही चॅनेल्सने त्या लोकांना पैसे दिल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

या जास्त टीआरपीच्या आकड्यांवरुन ज्या जाहिरातदारांनी जाहिराती दिल्या त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे. दरम्यान रिपब्लिक टीव्हीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.


Tags:    

Similar News