मालदीव सरकारच्या कार्यवाहीत तीन मंत्र्यांच निलंबन

Update: 2024-01-08 06:26 GMT

मालदीव सत्ताधारी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली. झाहिद रमीझ म्हणाले, भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानानंतर मालदीव च्या काही मंत्र्यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणीचे शेजारील राष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा करून या दौऱ्यातील फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केली. मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी त्यावर वादग्रस्त टिप्पण्या केल्या. यावरून मालदीव सरकार वादात सापडल आहे. मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली. भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. मालदीव सरकारने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांच्या मंत्र्याने केलेल्या या वक्तव्याशी सरकारचा संबंध नाही, असं म्हटलं आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदींचा दौरा

मालदीवच्या युवा सक्षमीकरमन उपमंत्री मरियम शिऊना यांनी मोदींना विदूषक आणी इस्रायल ची कंठपुतली म्हणल आहे. मोदी आणी भारता बद्दल एक्स (x)या समाज माध्यमावर अवमान कारक टिप्पणी केली असल्याने, भारत मालदीवशी स्पर्धा करू पाहतोय. मात्र,मालदीवच्या सागरी पर्यटनाशी स्पर्धा करण्यात भारताला मोठ्या आव्हानाना तोंड द्यावे लागेल,असेही काही मंत्र्याच म्हणण आहे.

मरियम शिउना यांना मालदीव सरकारने निलंबित केलं आहे. यांच्यासह मालशा शरीफ आणि महजून माजिद यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन मंत्र्यांनीदेखील नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. मालदीव माजी अध्यक्ष ईब्राहीम मोहम्मद सोली यांनी या मंत्र्यांचा तीव्र निषेध केला. मोदींचा दौरा हा दौरा पर्यटणाला चालना देणार दौरा समजला जातोय. मोदींच्या मालदीव दौऱ्यात ३६ बेटांचा समावेश आहे.

भारताशी तानावाचे वातावरण

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुइज्जू निवडून आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये मीठाचा खडा पडून तनाव वाढला आहे. मुइज्जू हे चीनधार्जिणे मानले जातात. नोव्हेंबर २०२३ मध्ये मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदावर येताच त्यांनी भारताबरोबरची काही धोरणं बदलली. तसेच मालदीवमध्ये असलेले भारतीय लष्करी अधिकारी पुन्हा मायदेशी पाठवले.

Similar News