महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एक विचारमंथन

Update: 2022-04-30 15:14 GMT

कामगार दिनाच्या आपल्याला शुभेच्छा...केंद्रीय कृषी कायद्यांप्रमाणेच मोदी सरकारने आणलेले नवीन कामगार कायदेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या कायद्यांमुळे कामगार देशोधडीला लागतील आणि भांडवलदारांकडे जास्तीचे अधिकार जातील अशी भीती कामगार संघटना व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर या कामगार कायद्यांचे विश्लेषण केले आहे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी...


महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या आपल्याला शुभेच्छा....भारतात अजूनही नोकरदार व्यक्ती किंवा कामगारांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार केला जात नाही, एवढेच नाही तर स्वत: नोकरदार किंवा कामगारही त्याबाबत फारसे जागरुक नसतात, मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे याचे विश्लेषण केले आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी...


महाराष्ट्राकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण महाराष्ट्र हा कायमच देणाच्या राजकाऱणाचा, अर्थकारणाचा, समाजकारणाचा केंद्रबिंदू का राहिला आहे, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी...


बदलत्या काळानुसार लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आर्थिक गुतंवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजनाबाबत त्यांना माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीचा फायदा होत असतो. पण अजूनही मराठी माध्यमांमध्ये अर्थविषयक बातम्यांच्या बाबतीत गांभिर्याने विचार होतो का, लोकांना उपयुक्त ठरतील अशा अर्थविषयक बातम्या न्यूज चॅनेल्सवर दाखवल्या जातात का, याबाबतचे विश्लेषण केले आहे अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....हेमंत देसाई यांनी महाराष्ट्रात वृत्तपत्रांमध्ये सर्वप्रथम अर्थविषयक स्वतंत्र पान सुरू केले होते.








Tags:    

Similar News